मुंबई : गतविजेता नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचण्याचे उद्दिष्ट ठेवलंय. कारण तो आज पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत भाग घेत आहे. जर ऑलिम्पिकमध्ये निरजने सुवर्णपदक किंवा इतकर कोणतंही पदक मिळवलं, तर वैयक्तिक ऑलिम्पिक खेळांमध्ये देशासाठी जास्त कौतुकाचं ठरणार आहे. पॅरिसमध्ये टोकियोच्या यशाची पुनरावृत्ती केल्यास एकेरी स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
मंगळवारी उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचा पुरुष हॉकी संघ कांस्यपदकाच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. आता सलग दुसऱ्या गेममध्ये कांस्यपदकासाठी त्यांचा सामना स्पेनशी होणार आहे. कुस्तीपटू अमन सेहरावत आणि अंशू मलिक आज मैदानात उतरणात आहेत.अदिती अशोक आणि दीक्षा डागर महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोकप्लेच्या फेरीत गोल्फ स्पर्धेत भारतीय दलाचे प्रतिनिधित्व करणार (Paris Olympics 2024) आहेत.
गोल्फसाठी दुपारी साडेबारा वाजता सामना होणार आहे. महिला वैयक्तिकमधून आदिती अशोक आणि दीक्षा डागर मैदानात उतरणार आहेत. स्ट्रोकप्लेच्या दुसऱ्या फेरीसाठी लढत होणार आहे.
ऍथलेटिक्समध्ये महिलांची १०० मीटर हर्डल्स रिपेचेज फेरी होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता हा सामना रंगणार आहे. ज्योती याराजी या स्पर्धेत भाग घेणार आहे.
आज ११ वाजून ५५ मिनिटांनी पुरूष भालाफेक सामन्याचा अंतिम सामना रंगणार (Neeraj Chopra) आहे. यामध्ये नीरज चोप्रा देशाचं प्रतिनिधित्व करत आहे.
कुस्तीमध्ये पुरूषांची ५७ किलो फ्रीस्टाईल फेरी दुपारी अडीच वाजता होणार आहे. अंशू मलिक आणि अमन सेहरावत मैदानात उतरणार आहे. पुरुष ५७ किलो फ्रीस्टाइल उपांत्यपूर्व फेरीत अमन सेहरावत पात्र ठरल्यास दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुन्हा लढत होईल. पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल उपांत्य फेरीत अमन सेहरावत पात्र ठरल्यास रात्री ९:४५ नंतर पुन्हा सामना (Paris Olympics Schedule) होईल. अशं मलिक देखील उपांत्यपूर्व फेरीत पात्र ठरल्यास पुन्हा उपात्य फेरीसाठी रात्री दहानंतर सामना होईल.
हॉकीसाठी पुरुषांचा कांस्यपदक सामना भारत विरुद्ध स्पेन रंगणार (Hockey Team Battle) आहे. दुपारी साडेपाच वाजता हा सामना रंगणार आहे. कास्यपदकासाठी लढत होणार आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.