ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल बऱ्याच लोकांना अंगदुखीचा त्रास होतो. हे बिघडलेली जीवनशैली आणि काही दैनंदिन सवयींमुळे असू शकते, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
काही लोक एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहतात. बसल्याने स्नायूंचा कडकपणा वाढू शकतो त्यामुळे पाठ, मान आणि शरीराच्या इतर भाग दुखू शकतात.
चुकीच्या पद्धतीने बसल्याने तसेच मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यासाठी वाकल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या मानेवर, खांद्यावर आणि पाठीवर दबाव येतो ज्यामुळे हळूहळू शरीर दुखण्यास सुरुवात होते.
झोप पूर्ण झाली नाही तर, शरीर थकलेले वाटू लागते. यामुळे स्नायूंचा थकवा आणि शरीरातील जडपणा वाढू शकतो.
डिहायड्रेशनमुळे थकवा येऊ शकतो. पुरेसे पाणी न पिल्यानेही शरीरात वेदना आणि अशक्तपणा येऊ शकतो.
जर तुम्ही दिवसभर शारीरिक हालचाली केल्या नाहीत तर तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. नियमित व्यायम न केल्याने शरीराचा जडपणा वाढून शरीर दुखण्यास सुरुवात होऊ शकते.
पोषक तत्वे कमी असलेल्या आहारामुळे देखील शरीर दुखू शकते. तसेच व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि वेदना वाढू शकतात.