ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, कडाक्याची गरमी आणि ऊन सगळीकडे वाढलेले आहे.
गरमीपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात.
तर जाणून घ्या उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत.
उन्हाळ्यात सफेद, गुलाबी, निळा आणि पिवळा अशा हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
हे कपडे जास्त सूर्यप्रकाश रिफलेक्ट करतात, ज्यामुळे शरीराची उष्णता कमी होते.
उन्हाळ्यात, तुम्ही कॉटन, इनरवेअर, खादी, रेयॉन आणि फॅब्रिक सारखे कपडे घालू शकता, जे शरीरातील ओलावा शोषून घेतात.
यामुळे शरीरातून हवा बाहेर पडते आणि शरीर थंड राहण्यास मदत होते.