ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात शरीरात अनेक बदल होतात आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
उन्हाळ्यात येणारा हलका ताप सुध्दा आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतो.
काही लोक डिहायड्रेट होतात, तर काहींना अचानक अशक्तपणा जाणवतो.
या समस्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बाहेरुन आल्यानंतर खूप काळजी घेणे.
बाहेरून आल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते, ज्यामुळे आजार होऊ शकतो.
घामाने भिजलेले कपडे घातल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो, म्हणून कपडे लगेचच बदलावेत.
बाहेरुन आल्यानंतर लगेचच एसी किंवा कूलरसमोर बसून थंड हवा घेणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.