Manasvi Choudhary
आजकाल चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक उत्पादने बाजारात मिळतात मात्र अनेकांना याचा त्रास देखील होताे.
नियमित योगा केल्याने शरीराचं रक्ताभिसरण सुधारते यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य देखील खुलते.
सर्वांगासन हा योगा प्रकार तुम्ही पाठीवर झोपून पाय हळूहळू ९० अंशात वर उचला आणि हातांनी कंबरेला आधार देऊन शरीर सरळ रेषेत वर करा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.
हलासन योगासन करताना पाय हळूहळू डोक्याच्या मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
मत्स्यासन योगासना करताना पाठीवर झोपून छाती वर उचला आणि डोक्याचा वरचा भाग जमिनीला टेकवा. या योगासनामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.
योगा करण्यापूर्वी किंवा नंतर तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्या. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या