Manasvi Choudhary
कारलं आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. कारल्याचा ज्यूस चवीला कडू असला तरी त्याचे फायदे बरेच आहेत.
तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कारल्याचा ज्यूस प्यायल्यास शरीराची चरबी कमी होण्यास मदत होईल.
कारल्यामुळे पोट भरलेले राहते सारखी भूक लागत नाही यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कारल्याचा रस करून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते व पचनक्रिया सुधारते.
कारल्याचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वातआधी कारल्याचे बारीक तुकडे करून त्यातील बिया काढा.
नंतर त्यावर थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून १५ मिनिटे ठेवा. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी मिक्स करून हे मिश्रण वाटून घ्या.
कारल्याचा रस वाढवण्यासाठी त्यात काळे मीठ, जिरे पूड आणि थोडे आले घाला.