Manasvi Choudhary
उन्हाळ्यात केस घामामुळे चिकट तसेच कोरडे आणि फ्रिजी देखील होतात यामुळे केसांची चमक निघून जाते.
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही घरगुती सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
उन्हाची किरणे थेट डोक्यावर पडल्याने केसांतील ओलावा कमी होतो. केस कोरडे होतात.
घराबाहेर पडताना नेहमी सुती स्कार्फ किंवा टोपीने केस झाकून घ्या यामुळे केसांचा थेट उन्हाशी संपर्क येणार नाही आणि ते कोरडे पडणार नाहीत.
केस आठवड्यातून किमान २-३ वेळा केस धुवा, जेणेकरून घामामुळे कोंडा किंवा खाज सुटणार नाही.
केस धुण्यासाठी जास्त कडक गरम पाणी वापरू नका, कोमट किंवा साध्या पाण्याने केस धुवा.
आठवड्यातून एकदा दही आणि मधाचा हेअर मास्क किंवा कोरफड जेल लावा. यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो.
उन्हाळ्यात केस मोकळे ठेवण्यापेक्षा सैल वेणी किंवा आंबाडा घालणे सर्वात चांगले असेल.