Periods Sweet Cravings : कुछ मिठा हो जाए! मासिक पाळी दरम्यान गोड खाण्याची क्रेव्हिंग का होते?

Periods Cravings Tips : मासिक पाळी दरम्यान महिलांना वेदनांसोबत विविध पदार्थांचे क्रेव्हिंगही होत असते. मासिक पाळी दरम्यान गोड खाण्याचे क्रेव्हिंग का होते आणि हे क्रेव्हिंग कंट्रोल कसे करावे जाणून घेऊयात.
Periods Cravings Tips
Periods Sweet Cravings SAAM TV

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पीरियड्स दरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उदा.ब्लोटिंग, क्रॅम्प्स, मूड स्विंग्स. तसेच मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक क्रेव्हिंगही होतात. त्यातील गोड खाण्याची क्रेव्हिंग हे सामान्य असली तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पीरियड्समध्ये गोड कमी खावे. जास्त गोड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून वजन वाढू लागते. तसेच शरीरातील साखरेचे पातळीही वाढू लागते. त्यामुळे गोड खाण्याचे क्रेव्हिंग कंट्रोल करणे गरजेचे आहे.

पीरियड्समध्ये गोड खाण्याची क्रेव्हिंग का होते?

कॅल्शियमची कमतरता

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोनची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे मूड स्विंग होऊन गोड खाण्याचे क्रेव्हिंग होते.

कार्ब्स आणि फॅट्सचे कमी सेवन

पीरियड्स दरम्यान कार्ब्स आणि फॅट्सचे सेवन कमी केल्यास शरीराला गोड खाण्याची गरज भासते.

हार्मोनल बदल

मासिक पाळी दरम्यान शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोन्स असंतुलीत होऊन मूड स्विंग होतात. त्यामुळे गोड खावेसे वाटते.

मानसिक आरोग्य

पीरियड्स दरम्यान काही महिला भावनिक होतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते.अशावेळी गोड खाण्याचे क्रेव्हिंग होते.

Periods Cravings Tips
Brain Tumor : सतत डोकं दुखतंय? सावधान! होऊ शकतो ब्रेन ट्यूमर, वाचा लक्षणे

पीरियड्स दरम्यान गोड खाण्याचे क्रेव्हिंग कंट्रोल कसे कराल?

मन शांत

पीरियड्स दरम्यान तुमचे मन शांत आणि आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपली आवडती कामे करून त्यात मन रमवा.

पौष्टिक आहार

मासिक पाळीच्या काळात पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच भूकही शांत होते.

जंक फूड टाळा

पीरियड्स दरम्यान अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग होते. पण ते आरोग्यास चांगले नसते. त्यामुळे जंक फूड खाणे टाळा. त्याऐवजी ड्रायफ्रुट्स, पोटाला थंड ठेवणारी फळे खा. तसेच तुम्ही थंड दही पिऊ शकता.

उत्तम आरोग्य ठेवा

शारीरिक आणि भावनिक आरोग्यास प्रोत्साहन द्या. पोषक आहारासोबत आवडती कामे देखील करा.

शरीर हायड्रेट ठेवा

पीरियड्स दरम्यान शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सतत पाणी आणि फळांचा नैसर्गिक ज्यूस प्या. तसेच हलके व्यायाम करा.

गोड पदार्थ दूर ठेवा

मासिक पाळी दरम्यान चॉकलेट खावेसे वाटतात. अशावेळी घरी किंवा आपल्या जवळ गोड पदार्थ ठेवणे टाळा.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Periods Cravings Tips
Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com