ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक पाळी महिलांना दर महिन्याला होणारी एक नैसर्गिक प्रकिया आहे. या प्रक्रिये दरम्याण अनेक महिलांना वेदना सहन करावा लागतात.
अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीची समस्या होऊ शकते. मासिक पाळी वेळेवर आली नाही तर आरोग्याला धोका होऊ शकतो.
अनियमित मासिक पाळीचे कारण शरीरात पोषणाची कमतरता आणि चुकीच्या सवयी आहेत. चुकिचा आहार खाल्यामुळे या समस्या उद्भवतात.
दैनंदिनातील या सवयी बदला तुमची अनियमित पाळीची समस्या होईल दूर. जास्त वेळ झोपू नका गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी नियमित होईल.
झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि यामुळे अनियमित पाळीची समस्या होऊ शकते.
गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन टाळा यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते.
आहार संतुलित पोषणाचा समावेश नसेल आणि जास्त ताण तर तुम्हाला अनियमित पाळीची समस्या उद्भवू शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़