Brain Tumor : सतत डोकं दुखतंय? सावधान! होऊ शकतो ब्रेन ट्यूमर, वाचा लक्षणे

Brain Tumor Causes Symptoms : डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे एकदिवस आपल्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची देखील शक्यता असते.
Brain Tumor Causes Symptoms
Brain Tumor Saam TV
Published On

कामाचा तणाव वाढल्याने अनेक व्यक्तींना सतत डोकेदुखीच्या समस्या उद्भवतात. डोकं दुखणे ही साधी समस्या आहे, असं समजून व्यक्ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या दिवशी डोकं फार जास्त दुखू लागलं त्यावर काही जण एक पेनकिलर घेतात. मात्र अशा पद्धतीने डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे एकदिवस आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची देखील शक्यता असते.

ब्रेन ट्यूमर हा असा आजार आहे तो कोणत्याही वयात होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूत गाठ झाल्यावर त्याचं ऑपरेशन करण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. अनेकदा ऑपरेशन करून सुद्धा व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे आज ब्रेन ट्यूमरबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे ब्रेन ट्यूमर?

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमधील पेशींची एक गाठ. ही गाठ मेंदूमध्ये आधी लहान असते. नंतर ती वाढत जाते. ब्रेन ट्यूमरचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मेंदूमध्ये गाठ झाली की ती आहे तशीच फार हळूहळू वाढते, त्याने व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो. तर दुसऱ्या प्रकारात गाठ मेंदूमध्ये वाढत जाते, त्याने व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

अनुवंशिकता

काही व्यक्तींना अनुवंशिकतेनुसार देखील ब्रेन ट्यूमरचा आजार होतो. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार असेल तर त्यांच्या मुलांना किंवा मग नातवंडांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते.

या व्यक्तींना होतो ब्रेन ट्यूमर

ब्रेन ट्यूमर एखाद्या लहान मुलाला सुद्धा होऊ शकतो. याची जास्त लक्षणे लहान मुलं आणि वृद्धांमध्ये दिसून येतात. तर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याची समस्या जास्त आहे. ज्या व्यक्ती जास्तप्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात असतात त्यांना याचा धोका जास्त असतो. ज्या व्यक्ती विविध रासायनिक कारखान्यांमध्ये काम करतात त्यांना सुद्धा ब्रेन ट्यूमर होतो.

लक्षणे

सतत डोकं दुखणे

डोळे दुखणे

मळमळ होणे

उपाय

ज्या व्यक्तीला डोकोदुखीचा जास्त त्रास होत असेल त्यांनी लगेचच त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय करा.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com