Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Divyang Kalyan Yojana for Handicapped People: राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी सरकारने योजना राबवली आहे. दिव्यांग कल्याण योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. आता दिव्यांग नागरिकांना १५ हजार रुपये मिळणार आहे.
Divyang Kalyan Yojana
Divyang Kalyan YojanaSaam Tv
Published On
Summary

दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५ हजार रुपये

स्वयंरोजगासाठी सरकारची आर्थिक मदत

३० वर्षानंतर निधी वाढवला

महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार १५ हजार रुपये मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी याबाबत माहिती दिली आहे.

स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून डीबीटी द्वारे थेट दिव्यांगांच्या खात्यावर निधी जमा केला जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदत होणार आहे.

Divyang Kalyan Yojana
LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळवा

तब्बल तीस वर्षानंतर टूलकिट खरेदीच्या रक्कमेत १५ पट वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेत १००० रुपये अर्थसहाय्य देण्यात होते. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण होईल.

दिव्यांग व्यक्ती आपल्या कौशल्यानुसार व्यवसाय करु शकतात. शिवणकाम, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर असे अनेक व्यवसाय ते करु शकतात. परंतु अनेकदा सामान घेण्यासाठी पैसे नसल्याने अडचणी येतात. याचसोठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने शासकीय संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करतात.या योजनेसाठी तुम्ही https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करु शकतात.

Divyang Kalyan Yojana
Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

२०११ च्या जणगणनेनुसार, राज्यात २९ लाख ६३ हजार दिव्यांग लोक आहेत. या दिव्यांग व्यक्तींना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जातो. तसेच नोकरभरतीमध्ये पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे युडीआयडी असायला हवे.

Divyang Kalyan Yojana
Government Scheme: सरकारची खास योजना! माजी सैनिकांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणार १ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com