Mohsin Naqvi Trophy Controversy saam tv
Sports

Asia Cup 2025: ...तेव्हाच मी ट्रॉफी भारताला देईन! ट्रॉफी चोर नकवींचा नवीन ड्रामा; घातली विचित्र अट

Mohsin Naqvi Trophy Controversy: एशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतरचा ट्रॉफी वितरण सोहळा खेळ आणि राजकारण यांच्यातील तणावामुळे अभूतपूर्व गोंधळात संपला.

Surabhi Jayashree Jagdish

एशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. ऐतिहासिक विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचा खेळ निराशाजनक राहिला आणि पराभवानंतरही त्यांची एशिया कपमधील निरोपाची वेळही वादांनी भरलेली ठरली.

पाकिस्तानचे गृह मंत्री आणि एशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नकवी यांच्यावर “ट्रॉफी चोर” अशी टीका सुरू झालीये. भारताच्या विजयानंतर नकवी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी एक नवीन अट ठेवत नवीन वाद उभा केला आहे.

नकवींची अट काय आहे?

मोहसिन नकवी यांनी विजेत्या टीम इंडियाला एशिया कपची ट्रॉफी आणि पदकं देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘औपचारिक समारंभ’ आयोजित केला गेला तरच ते भारताला ट्रॉफी देतील.

क्रिकबझच्या अहवालानुसार, नकवी यांनी ही अट एशिया कप आयोजकांना सांगितली आहे. मात्र, सध्या असा कोणताही समारंभ आयोजित होण्याची शक्यता फारच कमी मानली जाते.

BCCI उचलणार कडक पाऊल

नकवी भारताच्या अवॉर्ड सेरेमनीनंतर लगेचच स्टेडियममधून निघून गेले. परंतु हा वाद इथेच थांबला नाही. बीसीसीआयने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत हा मुद्दा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मंगळवारी म्हणजेच आज दुबईमध्ये होणाऱ्या एसीसीच्या बैठकीतही बीसीसीआय हे प्रकरण उपस्थित करणार आहे. ही बैठक भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे.

भारताने एशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि तिन्ही वेळा पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. प्रत्येक सामन्यानंतर पाकिस्तानकडून काहीतरी गोंधळ निर्माण करण्यात आला. कधी हँडशेक वाद, कधी ‘प्लेन क्रॅश’ सेलिब्रेशनवरून गोंधळ, तर आता मोहसिन नकवी यांनी ट्रॉफीवरून नवा वाद निर्माण केला आहे.

कधी मिळणार टीम इंडियाला ट्रॉफी

आता सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे लागलंय की, एशिया कपची ट्रॉफी अधिकृतरीत्या भारताच्या खात्यात कधी आणि कशा प्रकारे येणार. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की, मैदानात तसंच मैदानाबाहेरही पाकिस्तानला या स्पर्धेत पराभवाचाच सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडेमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलच्या टँकरला आग; सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही

SCROLL FOR NEXT