Abrar Ahmed: अर्शदीप, जितेश आणि हर्षितने उडवली अबरारची खिल्ली; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed: सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने भारताचा फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) बाद केले होते. त्यावेळी अबरारने विकेट मिळाल्यावर आपला ट्रेडमार्क 'सेलिब्रेशन' केले होते.
Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed
Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmedsaam tv
Published On

एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा जबरदस्त पराभव करून मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या या मोठ्या पराभवानंतर भारतीय टीमतील तरुण खेळाडू हर्षित राणा, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी मैदानाबाहेरही धमाल केली. त्यांनी पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदची मिमिक्री करत भन्नाट स्टाईलमध्ये त्याला ट्रोल केलं. काही सेकंदांचा हा मिश्किल पण भन्नाट व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

भारतीय खेळाडूंचा खास अंदाज

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला अक्षरशः ‘रोस्ट’ करत त्यांची खिल्ली उडवलीये. अर्शदीप, जितेश आणि हर्षित यांचा हा अंदाज चाहत्यांना जुना व्हिडीओ आठवला आहे. ज्या वेळी भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये मैदानावरील जोश आणि आत्मविश्वासाचं वातावरण असायचं. या तिघांनी दाखवून दिलं की, क्रिकेट फक्त कौशल्याचा खेळ नाही तर जिंकण्याच्या आत्मविश्वासाचा आणि उत्साहाचा संगम आहे.

Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed
Suryakumar Yadav: सूर्या दादाने फक्त ५ शब्दात पाकिस्तानी पत्रकाराला धुतलं, एका नजरेत बोलती केली बंद, पाहा Video

अबरार अहमदची भन्नाट मिमिक्री

अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जितेश शर्माने पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदची मिमिक्री करत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. टीम इंडियाने अंतिम सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर या तिघांनी हाताची घडी घालून आणि डोकं हलवून अबरारच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची हुबेहुब नक्कल केली आणि जणू “गेम ओव्हर” असं पाकिस्तानला सांगितलं.

Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed
Suryakumar Yadav: मी असं कधीच पाहिलं नाही...! ट्रॉफी नाकारण्याच्या मुद्द्यावर सूर्याने सोडलं मौन; नकवींवर साधला निशाणा

हा व्हिडिओ अर्शदीपने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला. ज्यामध्ये संजू सॅमसनही दिसत होता. काही सेकंदातच हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. मुख्य म्हणजे या सामन्यात संजू सॅमसनची विकेट अबरारने घेतली. त्यानंतर या तीन खेळाडूंनी अबरारची मिमिक्री केली.

Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed
Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

तिलक वर्माची झंझावाती खेळी

या संपूर्ण सामन्यात भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तिलक वर्मा. त्याने 53 बॉल्समध्ये नाबाद 69 रन्सची दमदार खेळी केली. त्याच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 147 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानला 5 विकेट्सने धुळ चारली. सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या ३ विकेट्स झटपट गेल्या. मात्र त्यानंतर तिलक वर्माने टीमला विजय मिळवून दिला.

Indian Players Troll Pakistan's Abrar Ahmed
Tilak Varma: अविस्मरणीय! पाकिस्तानला चारीमुंड्या चीत कसं केलं? प्रेशरमध्ये मास्टरक्लास खेळण्याचं गुपित तिलकनं उलगडलं, २ जणांना दिलं श्रेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com