Suryakumar Yadav: सूर्या दादाने फक्त ५ शब्दात पाकिस्तानी पत्रकाराला धुतलं, एका नजरेत बोलती केली बंद, पाहा Video

Surya Dada Sarcasm: भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एका पाकिस्तानी पत्रकाराला फक्त पाच शब्दांत दिलेले उत्तर (five-word reply) आणि त्यानंतर त्याची नजर रोखण्याची शैली सध्या तुफान चर्चेत आहे.
Surya Dada Sarcasm
Surya Dada Sarcasmsaam tv
Published On

एशिया कप 2025 च्या स्पर्धेचा शेवट टीम इंडियाच्या विजयाने झाला. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करून विजेतेपद पटकावलं. विजयानंतर भारतीय टीम्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला अभिषेक शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाले.

याच परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सूर्यकुमार यादवला असा प्रश्न विचारला, जो प्रत्यक्षात प्रश्नापेक्षा अधिक नाराजी आणि खंत व्यक्त करणारा होता. त्याने आपल्या मनातील सर्व खदखद एका प्रश्नात पूर्ण केली होती. यावेळी भारतीय कर्णधाराने त्यालाही अत्यंत मिश्किल स्वरूपात उत्तर दिलं.

Surya Dada Sarcasm
Asia Cup finals: चोर कुठले! सामन्यानंतर ट्रॉफीच नाही, भारतीय खेळाडूंची पदकंही गायब! BCCI चा पाकिस्तानवर आरोप

पाकिस्तानी पत्रकाराचा टोचणारा प्रश्न

पत्रकार परिषदेदरम्यान त्या पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारलं की, भारतीय संघाने सामन्यानंतर हँडशेक आणि फोटो सेशन का केलं नाही? तसंच भारतीय टीमने पत्रकार परिषदेला राजकीय स्वरूप का दिलं? त्याने पुढे विचारलं की, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही क्रिकेटमध्ये राजकारण आणणारे पहिले कर्णधार ठरलात? हा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजात नाराजी, हताशा स्पष्टपणे जाणवत होती.

Surya Dada Sarcasm
Suryakumar Yadav: मी असं कधीच पाहिलं नाही...! ट्रॉफी नाकारण्याच्या मुद्द्यावर सूर्याने सोडलं मौन; नकवींवर साधला निशाणा

सूर्यकुमार यादवनेही प्रत्युत्तर

हा प्रश्न ऐकल्यावर सूर्यकुमार यादव काही क्षण हसला. त्याने अतिशय हलक्या लहेजात उत्तर देताना त्या पत्रकाराला विचारलं, “गुस्सा हो रहे हो आप?” या एका वाक्यातच त्याने वातावरण हलकं केलं आणि प्रश्न विचारणाऱ्यालाही क्षणभर थांबायला लावलं.

Surya Dada Sarcasm
Tilak Varma: अविस्मरणीय! पाकिस्तानला चारीमुंड्या चीत कसं केलं? प्रेशरमध्ये मास्टरक्लास खेळण्याचं गुपित तिलकनं उलगडलं, २ जणांना दिलं श्रेय

यानंतर सूर्यकुमार म्हणाले, “तुम्ही एकदम इतक्या गोष्टी एकत्र विचारलात की नेमका प्रश्न काय आहे हेच समजलं नाही.” त्यांच्या या उत्तराने त्याने ना उग्र प्रतिक्रिया दिली ना विषय टाळला, उलट अत्यंत प्रगल्भतेने परिस्थिती हाताळली.

Surya Dada Sarcasm
India Asia Cup 2025 Winner : भारताचा विजय 'तिलक'! पाकिस्तानचे वस्त्रहरण; २१ दिवसांत तिसऱ्यांदा पराभवाची चव चाखवली

पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधाराचं संयमाचं प्रदर्शन

पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न हा भावनिक आणि आरोपात्मक स्वरूपाचा असतानाही सूर्यकुमार यादवने त्याला शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि थोड्याशा विनोदी पद्धतीने उत्तर देऊन संपूर्ण प्रसंगावर आपलं नियंत्रण ठेवलं. त्यांचा हा प्रतिसाद म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखा होता ज्यामुळे त्या पत्रकाराचा प्रश्नच उलटा फसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com