Dhurandhar Actress : 'धुरंधर' गर्लवर बलात्काराचा प्रयत्न, स्पॉट बॉयचं काळं कृत्य सांगताना अभिनेत्रीचा संताप अनावर

Dhurandhar Actress Share Shocking Experience : 'धुरंधर' चित्रपट सध्या सर्वत्र गाजत आहे. 'धुरंधर' फेम अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. स्पॉट बॉय तिला घाणेरडे मेसेज करायचा, असे तिने सांगितले.
Dhurandhar Actress Share Shocking Experience
Dhurandhar ActressSAAM TV
Published On
Summary

रणवीर सिंगचा 'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार आहे.

'धुरंधर'च्या कास्टला चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली.

'धुरंधर' फेम अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.

'धुरंधर' (Dhurandhar ) फेम अभिनेत्री आयशा खान (Ayesha Khan) चित्रपटातील एका गाण्यामुळे रातोरात स्टार झाली. तिने 'धुरंधर' चित्रपटात 'शरारत' गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. 'शरारत' गाण्याच्या शूटिंग दरम्यान आयशाला मासिक पाळी सुरू होती. तरी तिने कमाल डान्स केला. तिच्या डान्सचे आताही कौतुक होत आहे. अलिकडेच दिलेल्या एक मिडिया मुलाखतीत आयशा तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. जो वाचून तुमचाही थरकाप उडेल.

'मोजो स्टोरी' ला दिलेल्या मुलाखतीत आयशाला जेव्हा विचारण्यात आले की, "तुला बलात्काराच्या धमक्या मिळल्यात का?" तेव्हा आयशा खान म्हणाली, "हो, दररोज! मी माझा फोन उघडू शकते आणि तो तुम्हाला दाखवू शकते. दुःखाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या धमक्या आता सामान्य झाल्या आहेत. लोक त्याबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात, पण काहीही घडत नाही.धमकी देणारे, ट्रोल करणारे रोबोट नाहीत तर आपल्या सभोवतालची माणसेच आहेत. जे मला घाबरवतात. जर त्यांच्याकडे ताकद असती तर ते फक्त धमक्या देत नसते, त्यांनी जे प्रत्यक्षात लिहिले ते केले पण असते. "

आयशा स्पष्ट करते की तिच्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या घटनेची आठवण करून देताना आयशा भावुक झाली आणि म्हणाली, "कधीकधी या ऑनलाइन कमेंट्स जुन्या जखमा पुन्हा नव्याने उघड करतात ज्या मी विसरू इच्छिते. मला भीती वाटते की जर मी इतकी प्रसिद्ध नसती तर असे काहीतरी माझ्यासोबत पुन्हा घडले असते."

आयशाने सांगितले की, ती एकदा तिच्या वडिलांसोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. शूटिंग दरम्यान, तिला तिच्या इंस्टाग्रामवर जवळजवळ दररोज अश्लील व्हॉइस नोट्स आणि मेसेज येत होते. एके दिवशी तिला समजले नाही की, व्हॉइस नोट्स आणि मेसेज पाठवणारा व्यक्ती अनोळखी नाही तर तिच्या सेटवर काम करणारा एक स्पॉट बॉय आहे. तिने ताबडतोब प्रॉडक्शन आणि तिच्या वडिलांना कळवले आणि त्या मुलाची तक्रार केली.

Dhurandhar Actress Share Shocking Experience
Dhurandhar 2 : 'धुरंधर २' चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित, रणवीर सिंगचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला प्रेक्षक उत्सुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com