IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

Irfan Pathan hug Pakistani player: भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूसोबत हस्तांदोलन आणि आलिंगन करताना दिसला. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Irfan Pathan hug Pakistani player
Irfan Pathan hug Pakistani playersaam tv
Published On

गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच बिघडल्याचं पाहायला मिळतंय. राजकीय संघर्षाचा आता खेळावरही परिणाम झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावरची परिस्थिती गंभीर झाल्याचं पाहायला मिळतंय. आयसीसी किंवा एसीसी स्पर्धांसाठी एकमेकांच्या देशांना भेट देण्यावर निर्बंध घालण्यात आलेत.

इतकंच नाही तर यावेळी नो हँडशेक असा वादही गेल्या काळात सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्वांमध्ये माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी एका सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवले असून त्यांना मिठीही मारल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे एक नवा वाद समोर आल्याचं पाहायला मिळतंय.

Irfan Pathan hug Pakistani player
ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

पाकिस्तानकडून पराभव

सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये झालेल्या जागतिक क्रिकेट फेस्टिवलमध्ये 'डबल विकेट' स्पर्धा आयोजित करण्यात आलीये. ज्यामध्ये माजी भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. गुरुवारी म्हणजे २२ जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शोएब मलिक आणि इम्रान नझीर यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर चार ओव्हर्समध्ये ५६ रन्स केले.

तर या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी फलंदाजीसाठी आले. परंतु त्यांना चार ओव्हरमध्ये फक्त ५१ रन्स करता आले. पठाणने एकट्याने ४९ रन्सची खेळी तर बिन्नीला एकही रन करता आली नाही. अशाप्रकारे पाकिस्तानने सामना पाच रन्सने जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर जे घडलं ते अनपेक्षित होतं.

Irfan Pathan hug Pakistani player
IND vs NZ: दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरची एंट्री? या खेळाडूचं स्थान धोक्यात, पाहा संभाव्य प्लेईंग 11

सामना संपल्यानंतर इरफान पठाण आणि बिन्नी यांनी शोएब मलिकशी हँडशेक केलं आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी टीम सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन केलं जसं वर्षानुवर्षे सुरु आहे. गेल्या वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांना हँडशेक करताना दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इतकंच नाही तर पाकिस्तानी युझर्न इरफानला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता. मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे आधीच संबंध ताणलेले होते. याचा परिणाम दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांवरही झाला. लष्करी संघर्षानंतर काही आठवड्यांनंतर इंग्लंडमध्ये झालेल्या एका स्पर्धेत माजी खेळाडूंनी भारत-पाकिस्तान सामना खेळलाच नाही.

Irfan Pathan hug Pakistani player
Rohit Sharma: हिटमॅन नाही आता ‘डॉक्टर’ रोहित शर्मा! भारताच्या माजी कर्णधाराला मानद डॉक्टरेट

त्याचप्रमाणे आशिया कप टी-२० मध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला. मात्र यामध्येही प्रचंड तणाव दिसून आला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण टीमने टॉसदरम्यान आणि सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करण्यास नकार दिला. ही परिस्थिती स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर महिला वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंनी हँडशेक करण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com