

वनडे सिरीजनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता पाच सामन्यांची T20 सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर दुसरा सामना आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या T20I मध्ये ४८ रन्सने दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारताचं लक्ष्य या सामन्यात २-० अशी आघाडी घेण्याकडे असणार आहे.
रायपूरचं हे मैदान अजूनही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तुलनेने नवं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर फक्त एकच पुरुषांचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात भारतीय टीमने एकूण १७४ रन्स डिफेंड केले होते.
रायपूरचं पीच गोलंदाजांना सुरुवातीला चांगला बाऊंस देणार आहे. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. दरम्यान सामना जसजसा पुढे जाईल तशी खेळपट्टी थोडी स्लो होऊ शकते. अशावेळी फलंदाजांना जलद गतीने रन्स करण्यास मदत होणार आहे.
इशान किशन बऱ्याच काळानंतर भारतीय टी-२० टीममध्ये परतला. मात्र पहिल्या टी-२० सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्याला केवळ ८ रन्स करता आले. अशावेळी दुसऱ्या सामन्यात इशानला संधी मिळणार का हा प्रश्न आहे. कारण भारताकडे श्रेयस अय्यरचा पर्याय देखील आहे. इशान तिलक वर्माच्या जागी पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय टीममद्ये स्थान देण्यात आलंय.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
टिम रॉबिन्सन, डेवोन कॉन्वे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जॅकब डफी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.