Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल, प्रकरण काय?

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या बालमित्र विज्ञान मानेने बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छलविरोधात ४० लाखांच्या फसवणुकीची सांगली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Smriti Mandhana
Smriti MandhanaSaam tv
Published On

Smriti Mandhana: बॉलिवूड संगीतकार व दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यावर भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या बालमित्राने आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. सांगली येथील विज्ञान माने यांनी संगीतकार व दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यावर ४० लाख रुपयांसाठी फसवणूकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली आहे.

विज्ञान माने हा युवक मराठी सिनेसृष्टीशी जोडलेला असून त्याने काही चित्रपटांसाठी फायनान्सर म्हणून काम केले आहे. स्मृती मंधानाचा बालमित्र म्हणून ओळखला जाणारा विज्ञान माने आणि पलाश यांची ओळख स्मृतीच्या कुटुंबीयांमार्फत झाली होती. यावेळी, पलाशने त्याच्या आगामी ‘नजरिया’ नावाच्या चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी मानेकडून पैसे घेतले होते. त्यानुसार, चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, असे आश्वासनही दिले होते.

Smriti Mandhana
Salman Khan: पुन्हा अडकला सलमान खान; दिल्ली हायकोर्टाने सलमान खानला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

मात्र पुढे चित्रपटाचे काम पूर्ण न झाल्यामुळे आणि पैसे परत न मिळाल्यामुळे माने यांनी पलाशकडे रक्कम परत मागितली. मात्र, पलाशकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चर्चा सुरू झाली. यानंतर विज्ञान माने यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांनी पलाशकडून संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे. त्याने मोबाईल नंबर ब्लॉक केला असल्याचा आरोपही केला आहे.

Smriti Mandhana
Anupam Kher: चेहरा वाकडा, बोलायला त्रास...; अनुपम खेर यांना झाला 'हा' आजार, त्यात मुलानेच वाजवली कानाखाली

या आरोपांपूर्वीही पलाश आणि स्मृती मंधानाच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली आहे. स्मृती आणि पलाश यांचे लग्न 2025 मध्ये होते, परंतु नंतर थेट रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियाद्वारे स्वतंत्रपणे हा निर्णय सांगितला.

पलाश किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांवर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सांगली पोलिसांनी या तक्रारीची चौकशी सुरू केली असून पुढील कायदेशीर कारवाई कशी पुढे जाते, याकडे सर्वांची नजर लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com