Anupam Kher: चेहरा वाकडा, बोलायला त्रास...; अनुपम खेर यांना झाला 'हा' आजार, त्यात मुलानेच वाजवली कानाखाली

Anupam Kher: अनुपम खेर वेदनेने रडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड होत आहे. हा व्हिडिओ सिकंदर खेर यांनी शेअर केला आहे.
Anupam Kher suffered from this disease his son sikandar slap him shared video
Anupam Kher suffered from this disease his son sikandar slap him shared video Saam tv
Published On

Anupam Kher: अभिनेता सिकंदर खेर यांनी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचे वडील अभिनेते अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना खूप वेदनां होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते अभिनेते अनुपम खेर यांच्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत.

अनुपम यांचा व्हायरल व्हिडिओ

सिकंदर खेर यांनी इंस्टाग्रामवर त्यांचे वडील अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम यांनी सांगितले की दात काढल्यानंतर त्यांच्या गाल सुन्न झाला आहे आणि त्यांना बोलायला त्रास होत आहे. व्हिडिओमध्ये, सिकंदर विनोदाने त्यांच्या वडिलांच्या गालावर मारतो. सुरुवातीला, अनुपम घाबरतात आणि म्हणतात, 'तू काय करणार आहेस? मला जास्त मारू नकोस, नाहीतर मी तुला माझ्या दुसऱ्या हाताने मारेन आणि तुझं नाक तोडेन' नंतर, जेव्हा सिकंदर पुन्हा अनुपम यांच्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनुपम त्यांचा चेहरा बाजूला करतात आणि म्हणतात, 'नाही, नाही, बेटा, असे करू नकोस'

Anupam Kher suffered from this disease his son sikandar slap him shared video
Salman Khan: पुन्हा अडकला सलमान खान; दिल्ली हायकोर्टाने सलमान खानला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

सिकंदरची पोस्ट

सिकंदरने इंस्टाग्रामवर अनुपम खेरचा एक व्हिडिओ शेअर केला. सिकंदरने त्याला कॅप्शन दिले आहे, 'जावेद अख्तर (काका), बोनी कपूर, अनिल कपूर, शेखर कपूर (काका)... खेर साहेबांचा दात काढल्यानंतरचा एक फनी व्हिडिओ.' अनुपमच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'खेर साहेब आणि तुम्ही माझे आवडते आहात.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले, 'मला ही बाप-मुलाची जोडी फार आवडते.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'अनुपम जी, स्वत:ची काळजी घ्या'

Anupam Kher suffered from this disease his son sikandar slap him shared video
Devmanus: इन्स्पेक्टर जामकर गोपाळला आर्याच्या मृतदेहासह रंगेहाथ पकडणार? 'देवमाणूस' मालिकेत येणार धक्कादायक ट्विस्ट

अनुपम खेर बद्दल

मस्तीने भरलेला हा गोंडस बाप-मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुपम यांनी अलीकडेच 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे हा चित्रपट सध्या ऑस्करच्या स्पर्धत आहे आणि लवकरच ते 'खोसला का घोसला २' मध्ये दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com