ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Bangladesh ICC reprimand World Cup: आगामी टी२० वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश क्रिकेट टीमवर संकटाचे ढग दाटले आहेत. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला फटकारलं असून त्यांच्या मागणीला नकार दिला आहे.
Bangladesh ICC reprimand World Cup
Bangladesh ICC reprimand World Cupsaam tv
Published On

आता येत्या काही दिवसांतच आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये बांगलादेश क्रिकेट वर्ल्डकप खेळणार की नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. बांगलादेश त्यांची टीम भारतात पाठवणार की वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा धोका पत्करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आयसीसीच्या २४ तासांच्या अल्टिमेटमनंतर बांगलादेशमध्ये गोंधळ उडाला असून सरकारने एक मोठं पाऊल उचललंय.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश सरकारने २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी निवडलेल्या खेळाडूंसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावलीये. ही बैठक दुपारी ३ वाजता ढाकामधील हॉटेल कॉन्टिनेंटलमध्ये होणार आहे. या बैठकीत सरकारी स्पोर्ट्स सल्लागार आसिफ नजरुल खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. मुख्य म्हणजे ही बैठक केवळ औपचारिक नसून वर्ल्डकपमध्ये सहभागी व्हायचं की नाही या निर्णयासाठी असल्याचं म्हटलं जातंय.

खेळाडूंशी का चर्चा करतंय सरकार?

या बैठकीतून अनेक अर्थ काढण्यात येतायत. यामध्ये पहिलं तर सरकारला वादाबद्दल खेळाडू काय विचार करतात हे जाणून घ्यायचं आहे. तर दुसरं म्हणजे सरकार खेळाडूंना परिस्थितींबाबत माहिती द्यायची आहे. सुरक्षा, राजकीय दबाव आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा या सर्व मुद्द्यांवर उघडपणे चर्चा होण्याची शक्यता आहे.

Bangladesh ICC reprimand World Cup
Ind Vs Nz: पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११; या खेळाडूंना मिळणार संधी

खेळाडूंना भेटण्यापूर्वी, बांगलादेश सरकारने क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री बीसीबी अध्यक्ष आणि डायरेक्टर्सने क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्या घरी भेट घेतली.

दरम्यान या वादामध्ये बांगलादेशाची परिस्थिती काहीशी कमकुवत असल्याचं दिसून येतंय. भारतात खेळण्यास बांगलादेशने नकार दिल्याने आणि जागा बदलण्याच्या त्यांच्या मागणीवर आयसीसीने मतदान घेतलंय. ज्यामध्ये बांगलादेशला २-१४ अशी मतं मिळाली असून पराभव पत्करावा लागला. फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केलं. तर इतर सर्व बोर्डांनी भारताला पाठिंबा दिला.

Bangladesh ICC reprimand World Cup
Gautam Gambhir: इंदूरच्या मैदानावर लागले 'गौतम गंभीर हाय-हाय'चे नारे; चाहत्यांचा संताप पाहता विराटने केलं असं कृत्य की...! Video viral

यानंतर आयसीसीने स्पष्ट संकेत दिलेत की, एकतर बांगलादेश सरकारला टीम पाठवण्यास राजी करा किंवा वर्ल्डकप बाहेर पडण्याची तयारी ठेवा. जर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली तर स्कॉटलंडला त्यांची जागा घेण्याची संधी दिली जाऊ शकते.

Bangladesh ICC reprimand World Cup
Saina Nehwal Retirement: दुखापतीनंतर सायना नेहवालचा मोठा निर्णय; बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com