Saina Nehwal Retirement: दुखापतीनंतर सायना नेहवालचा मोठा निर्णय; बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती

Saina Nehwal retires badminton: भारतीय बॅडमिंटनची स्टार खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती स्पर्धेतून दूर होती आणि अखेर तिने निवृत्तीचा निर्णय घेतला
Saina Nehwal Retirement
Saina Nehwal Retirementsaam tv
Published On

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने निवृत्तीची घोषणा केली आहे. २०१२च्या लंडन ऑलिंपिकमध्ये बाँझ मेडल जिंकून जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या नेहवालने तिच्या कारकिर्दीचा अंत केला आहे. सायनाच्या म्हणण्यानुसार, तिचं शरीर आता तिला या खेळासाठी साथ देत नाही.

एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठणाऱ्या सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केलीये. तिचं शरीर आता या खेळाच्या शारीरिक गरजा सहन करू शकत नाही, असं सायनाने म्हटलंय. सायना तब्बल गेल्या दोन वर्षांपासून बॅडमिंटनपासून दूर होती आणि तिचा शेवटचा सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपनमध्ये झाला होता.

Saina Nehwal Retirement
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचं टी-20 मध्ये कमबॅक! सिरीजपूर्वीच BCCI कडून टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल

बॅडमिंटन स्टार सायनने घेतली निवृत्ती

बॅडमिंटन खेळत नसून तिने अधिकृतरित्या निवृ्त्तीची घोषणा केली नव्हती. परंतु आता तिने हा कठीण निर्णय घेतला आहे. सायना एका पॉडकास्टमध्ये म्हणाली, मी दोन वर्षांपूर्वी खेळणं थांबवलं होतं, मला खरोखर वाटतं की, मी माझ्या स्वतःच्या अटींवर या खेळात प्रवेश केला आणि तो माझ्या स्वतःच्या अटींवर सोडला. त्यामुळे मला ते जाहीर करण्याची गरज नव्हती. जर तुम्ही आता खेळू शकत नसाल तर ते ठीक आहे.

सायना नेहवालने पुढे सांगितलं की, तुमचं कार्टिलेज पूर्णपणे खराब झाला आहे, तुम्हाला संधिवात आहे. त्यामुळे निवृत्तीची बाब माझ्या पालकांना माहित असायला हवी. माझ्या कोचना हे माहित असायला हवी आणि मी त्यांना फक्त सांगितलं. आता मी खेळू शकणार नाही कारण ते कठीण आहे.

Saina Nehwal Retirement
IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

जगातील सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी तुम्हाला आठ ते नऊ तास सराव करावा लागतो. पण माझा गुडघा फक्त एक-दोन तासांतच हार मानत होता. तो सुजला होता आणि खेळणं खूप कठीण झालं होतं. म्हणून मला वाटले आता बस्स झालं, असंही सायनाने म्हटलंय.

Saina Nehwal Retirement
Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

सायना नेहवालचं नेटवर्थ किती आहे?

काही रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ₹३६ ते ₹४२ कोटी दरम्यान आहे. अहवाल असंही सांगतात की, तिचं वार्षिक उत्पन्न ₹५ कोटी पर्यंत आहे. योनेक्स, बीपीसीएल, हर्बालाइफ आणि इतरांसह हाय-प्रोफाइल ब्रँड एंडोर्समेंटमधून ती कमाई करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com