Gautam Gambhir: इंदूरच्या मैदानावर लागले 'गौतम गंभीर हाय-हाय'चे नारे; चाहत्यांचा संताप पाहता विराटने केलं असं कृत्य की...! Video viral

Gautam Gambhir-Virat Kohli: इंदूर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली. भारतीय टीमचा माजी खेळाडू गौतम गंभीर मैदानात आला तेव्हा प्रेक्षकांनी हाय हाय अशी घोषणाबाजी केली.
Gautam Gambhir
Gautam Gambhirsaam tv
Published On

भारत आणि न्यूझीलंडमधील सिरीज संपली असून किवींनी ही सिरीज १-२ अशी जिंकली. दरम्यान भारताने ही सिरीज गमावल्यानंतर टीम इंडियाचे चाहते चांगलेत संतापले होते. या सिरीजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं.

वनडे सिरीजचा शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडिया आणि कोचविरूद्ध घोषणाबाजी झाली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी "गौतम गंभीर हाय हाय" अशी घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानावर उपस्थित होते.

Gautam Gambhir
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचं टी-20 मध्ये कमबॅक! सिरीजपूर्वीच BCCI कडून टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर गौतम गंभीर हाय-हाय असे नारे पाहायला मिळाले. हेड कोच गंभीर हे सर्व घडत असताना टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह मैदानावर होता. दरम्यान गंभीरच्या बाजूला इतर खेळाडूही उपस्थित होते आणि त्यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. स्टेडियममधील चाहत्यांचं वागणं पाहून त्यालाही धक्का बसला. यावेळी विराटने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Gautam Gambhir
Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

केएल राहुलशी बोलताना विराट कोहलीने गर्दीकडे बोट दाखवलं. या प्रतिक्रियेवरून असं दिसून आलं की, चाहत्यांचं असं वागणं कोहलीला अजिबात आवडलेलं नाहीये. गंभीरविरुद्ध घोषणा आणि त्यावर विराटने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

Gautam Gambhir
Saina Nehwal Retirement: दुखापतीनंतर सायना नेहवालचा मोठा निर्णय; बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती

टीम इंडियाने गमावली वनडे सिरीज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजमधील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने यापूर्वी कधीही सिरीजच्या निर्णायक सामन्यात भारताला हरवलं नव्हतं. इतकंच नाही तर भारतात कधीही वनडे सिरीज जिंकली नव्हती. त्यामुळे चाहत्यांना टीम इंडियाच्या विजयाची अपेक्षा होती. मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे लागल नाही. भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीज गमावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com