Dhurandhar 2 : 'धुरंधर २' चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित, रणवीर सिंगचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला प्रेक्षक उत्सुक

Dhurandhar 2 New Trailer Launch Date : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चे मोठे अपडेट समोर आले आहे. 'धुरंधर २'ची ट्रेलर लाँच तारीख बदलली असून नवीन तारीख समोर आली आहे.
Dhurandhar 2 New Trailer Launch Date
Dhurandhar 2saam tv
Published On
Summary

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'धुरंधर २' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची नवीन तारीख समोर आली आहे.

'धुरंधर २' दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट 'धुरंधर 2'मुळे चांगला चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' ला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. त्यांनी जगभरात कोटींचा व्यवसाय केला.'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. पहिल्या भागात अक्षय खन्नाचे पात्र मरते. दुसऱ्या भागाची कथा ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'धुरंधर 2' बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

ट्रेलर रिलीज डेट बदलली

'धुरंधर 2'च्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र ट्रेलरची रिलीज डेट बदलली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' चा ट्रेलर 3 मार्चला रिलीज करण्यात येणार होता. मात्र चंद्रग्रहणामुळे निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता 'धुरंधर २'ची नवीन ट्रेलर रिलीज डेट समोर आली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 5 मार्चला रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' चा रनटाइम 3 तास ​​55 मिनिटे असेल. याचा अर्थ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षाही जास्त असेल. 'धुरंधर' चा रनटाइम 3 तास ​​34 मिनिटे होता. 'धुरंधर' मध्ये अक्षय खन्नाचे पात्र रहमान खलनायक म्हणून मरतो आणि आता अर्जुन रामपाल रणवीरच्या भूमिकेचा सामना करणारा पुढचा खलनायक असेल. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

धुरंधर

'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. 'धुरंधर' चित्रपट आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. चित्रपटातील सारा अर्जुन आणि रणवीर सिंगच्या केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. तर अक्षय खन्नाचा स्वॅगने जगभरात धुमाकूळ घातला.

Dhurandhar 2 New Trailer Launch Date
Bigg Boss Marathi 6 : आठव्या आठवड्यात ७ सदस्य नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com