Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Ranapati Shivray Swari Agra: छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रम आणि धैर्यामुळेच नव्हे, तर त्यांच्या असामान्य बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि अद्वितीय रणनीतीमुळे आजही प्रेरणास्थान ठरतात. महाराजांचा हाच पराक्रम रणपति शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात उलगडणार आहे.
Ranapati Shivray
Ranapati ShivraySaam tv
Published On

Ranapati Shivray Swari Agra: छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रम आणि धैर्यामुळेच नव्हे, तर त्यांच्या असामान्य बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि अद्वितीय रणनीतीमुळे आजही प्रेरणास्थान ठरतात. अशाच एका ऐतिहासिक आणि धाडसी घटनेचा थरारक प्रवास मांडणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आला. या सोहळ्यात रणपति शिवराय स्वारी आग्रा चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.

ट्रेलर अनावरण सोहळ्याची सुरुवात शिववंदनेने झाली. शिवशाहिरांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्याने उपस्थितांमध्ये वीररस संचारला. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही इतिहासातील अत्यंत धोकादायक आणि निर्णायक घटना मानली जाते. औरंगजेबसारखा कपटी आणि संशयी शत्रू, कडेकोट पहारा आणि अनिश्चिततेचे सावट अशा परिस्थितीत महाराजांनी दाखवलेले धैर्य, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्व याची प्रभावी झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळते.

Ranapati Shivray
Anupam Kher: चेहरा वाकडा, बोलायला त्रास...; अनुपम खेर यांना झाला 'हा' आजार, त्यात मुलानेच वाजवली कानाखाली

मराठी चित्रपटसृष्टीच्या मार्केटिंग संकल्पनांमध्येही नवे प्रयोग सुरू असल्याचे या चित्रपटाच्या निमित्ताने दिसून आले. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’च्या माध्यमातून इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वे AI आधारित चॅटबॉटद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या सोहळ्यात महाराजांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. हे चॅटबॉट विविध भाषांमध्ये काही सेकंदांत प्रश्नांची उत्तरे देणार असून शिवप्रेमींसाठी हा उपक्रम अभिमानास्पद ठरत आहे.

Ranapati Shivray
Salman Khan: पुन्हा अडकला सलमान खान; दिल्ली हायकोर्टाने सलमान खानला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले की, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शिस्तबद्ध आखणीची आणि शौर्याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. निर्मात्यांनीही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओजकडून या चित्रपटाचे जागतिक वितरण करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com