Bigg Boss Marathi 6 : आठव्या आठवड्यात ७ सदस्य नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट?

Bigg Boss Marathi 6 - Nomination : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Bigg Boss Marathi 6 - Nomination
Bigg Boss Marathi 6 saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला.

आठव्या आठवड्यात 7 सदस्य नॉमिनेट झाले.

विशाल आण रुचिता यांच्या नात्यात दुरावा आला आहे.

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 6 ) घरात आता आठवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात रोशन भजनकर याने घराचा निरोप घेतला आहे. या आठड्यात घराबाहेर कोण जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. अनुश्री राकेश आणि राखीला एकमेकांवरून मस्करी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे संस्कृती साळुंकेमुळे विशाल आणि रुचिताच्या नात्यात दुरावा आला आहे. अनुश्री आणि प्राजक्तामध्ये गेम कळण्यावरून वाद झाला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेशन टास्क

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क दरम्यान ड्रामा पाहायला मिळाला. या आठवड्यात प्रत्येक सदस्याने दोन नॉमिनेशन करायचे होते. राखी सावंत तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद दोघांना खूप सुनावते आणि नॉमिनेट करते. तन्वी कोलते प्राजक्ता आणि रुचिताला नॉमिनेट करते. अनुश्री, सागर आणि प्राजक्ताला नॉमिनेट करते. तर प्रभू, प्राजक्ता आणि रुचिताला आणि संस्कृती, प्राजक्ता आणि सागरला नॉमिनेट करते. नॉमिनेशन टास्कमध्ये सागर आणि संस्कृतीमध्ये भांडणे होतात.

बिग बॉसच्या घरातून कोण नॉमिनेट?

  • प्राजक्ता शुक्रे

  • तन्वी कोलते

  • रुचिता जामदार

  • दिपाली सयद्द

  • प्रभू

  • सागर कारंडे

  • संस्कृती साळुंके

'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन दोन महिने होत आले आहे. या आठवड्यात तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. यात मराठी अभिनेता संकेत पाठक, हिंदी अभिनेत्री रेवा कौरासे, संस्कृती साळुंके यांचा समावेश आहे. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 6 - Nomination
Bigg Boss Marathi 6 Video : विशालसोबत ब्रेकअप; राखीशी बोलताना रुचिता चक्कर येऊन पडली, बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com