Bigg Boss Marathi 6 : नॉमिनेशन टास्कमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; कोणी कापली कोणाची पतंग? थेट 9 सदस्य नॉमिनेट

Bigg Boss Marathi 6 First Nomination : बिग बॉसच्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. तब्बल 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. कोणत्या सदस्याने कोणाची पतंग कापली, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6 First Nomination
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला.

नॉमिनेशनसाठी 'पतंग' कापण्याचा टास्क देण्यात आला होता.

घरातील 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. घरातील तब्बल नऊ सदस्य नॉमिनेट झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात कोणाचा प्रवास थांबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमधील मतभेद दिसून आले आहेत. टास्कमध्ये सोनालीने रोशनची पतंग कापली आणि त्याला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. नॉमिनेशनसाठी 'पतंग' कापण्याचा टास्क देण्यात आला होता.

नॉमिनेशन टास्क वेळी सोनालीने स्पष्टपणे सांगितले की, "इतर सदस्यांच्या तुलनेत रोशनचे घरातील योगदान अत्यंत कमी आहे." सोनालीच्या या विधानामुळे रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले आणि घरात वादाची ठिणगी पडली. संतापाच्या भरात त्याने सोनालीवर वैयक्तिक टीका केली. तो म्हणाला की, "शहरातल्या माणसांचे हेच काम असते, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन वर जायचे... " रोशनची गेममधील पकड कमी असल्याने त्याला नॉमिनेट करणे योग्य असल्याचे तिने म्हटले. तर रोशन बोलतो की, "आता तुमच्याकडून ट्यूशन घ्यावी लागेल..."

टास्कमध्ये तन्वीने सागर आणि दिव्याला नॉमिनेट केले. सोनालीने रोशनसोबत राधालाही नॉमिनेट केले. तर पुढे प्राजक्ताने प्रभू-अनुश्री यांना नॉमिनेट केले. त्यांचाी पतंग कापली. त्यामुळे एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेट सदस्यांची यादी

  1. दिपाली सय्यद

  2. करण सोनवणे

  3. रुचिता जामदार

  4. प्रभू शेळके

  5. अनुश्री माने

  6. सागर कारंडे

  7. दिव्या शिंदे

  8. रोशन भजनकर

  9. राधा पाटील

'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. रितेश भाऊंच्या वीकेंडच्या वारमध्ये कोण घराबाहेर जाणार आणि कोण सुरक्षित राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 6 First Nomination
Famous Singer Death : लोकप्रिय गायकाचं निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com