Siddhi Hande
मकरसंक्रांत अवघ्या दोन दिवसावर आहे. यानिमित्त अनेकजण पतंग उडवतात.
लहान मुलांना शाळेत पतंग बनवण्यासाठी सांगतात. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पतंग बनवू शकतात.
विविध रंगाचे कार्ड पेपर, ग्लू, स्टिकर्स, सजावटीचे सामान, पेन, खडू कलर
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगाचा कार्डपेपर घ्यायचा आहे. हा कार्डपेपर चौकोनी आकारात कापून घ्यायचा आहे.
यानंतर वेगळ्या रंगाच्या कार्डपेपरचा एक त्रिकोणी तुकडा कापून घ्या.
यानंतर कार्डपेपरच्या चौकोनी आकाराच्या एका टोकाला हा त्रिकोणी आकाराचा तुकडा गमच्या साहाय्याने चिटकवून ध्या.
यानंतर हा कार्डपेपर उभ्या आकारात पकडा. जेणेकरुन त्याचा आकार पतंगासारखा दिसेल. त्यावर तुम्ही पतंगाचे डिझाइन किंवा तिळगुळाचे डिझाइन काढू शकतात.
या पतंगावर तुम्ही वेगवेगळे स्टिकर्स लावू शकतात. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हीटीचा वापर करुन हे पतंग छान सजवा.
याचसोबत पतंगावर तुम्हाला एखादा विशेष मेसेजदेखील लिहू शकतात. ज्यामुळे जनजागृती होईल.