Sakshi Sunil Jadhav
मकर संक्रातीला तुम्हाला तुम्ही तिळाचे लाडू बनवत असाल तर ही सोपी आणि योग्य प्रमाण दिलेली रेसिपी नक्कीच नोट करा.
पांढरे तिळ अर्धी वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी, गूळ २ वाटी, तूप ३ चमचे, वेलची पूड अर्धी वाटी इ.
तिळ शेंगदाण्याचे लाडू हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात आणि ऊर्जा वाढवणारे पारंपरिक पदार्थ मानले जातात. म्हणून संक्रातीला याचे वाटप केले जाते.
तीळ मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजावेत, तर शेंगदाणे खरपूस भाजून सोलून घ्या, त्यामुळे लाडूंना चांगली चव येते.
भाजलेले तिळ आणि शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करून लाडू केल्याने चव रुचकर होते.
तुपात किसलेला गूळ वितळवून त्यात पूड मिक्स करा. याने लाडवांना नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकता मिळते.
गूळ लवकर घट्ट होतो. म्हणून मिश्रण गरम असतानाच लाडू वळा त्याने नीट आकारही येतो.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवलेले हे लाडू चविष्ट, पौष्टिक असून हिवाळ्यात आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.