Famous Singer Death : लोकप्रिय गायकाचं निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Singer Death : मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचे वयाच्या 75 निधन झाले. गायकाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Singer Death
Famous Singer Deathsaam tv
Published On
Summary

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

प्रसिद्ध गायकाचे निधन झाले.

गायक समर हजारिका यांनी 75 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाले आहे. ज्येष्ठ आसामी संगीतकार समर हजारिका यांचे वयाच्या 75 वर्षी निधन झाले. समर हजारिका हे प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका यांचे धाकटे भाऊ होते.समर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही शोक व्यक्त केला आहे आणि गीतकारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गायक-संगीतकार समर हजारिका यांचे निधन मंगळवारी झाली. ते दिग्गज गायक आणि भारतरत्न पुरस्कार विजेते डॉ. भूपेन हजारिका यांचे सर्वात धाकटे भाऊ होते. समर हजारिका खूप काळापासून आजारी होते. अलिकडेच ते रुग्णालयातून ठीक होऊन घरी आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, समर हजारिका यांनी गुवाहाटीतील निझारापार येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समर हजारिका यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. समर हजारिका यांनी रेडिओ, अल्बम आणि चित्रपटांसाठी असंख्य गाणी गायली आणि संगीतबद्ध केली. समर हजारिका हे त्यांच्या कुटुंबातील 10 भावंडांपैकी सर्वात लहान होते. त्यांनी संगीत क्षेत्रात कुटुंबाचा वारसा मोठ्या उत्साहाने पुढे नेला.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर समर हजारिका यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विटमध्ये लिहिले की, "समर हजारिका यांच्या मधुर आवाजाने प्रत्येक क्षण खास बनवला आणि आसामच्या सांस्कृतिक वारशात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या निधनाने आसामने आणखी एक सुवर्ण आवाज गमावला आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत."

Singer Death
Allu Arjun : अल्लू अर्जुनचा बोलबाला; 'पुष्पा 2'ची परदेश वारी, प्रेक्षकांची मनं जिंकणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com