Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात

Corporation Election 2026: डोंबिवलीमध्ये पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांच्यामध्ये राडा झाला. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणात आता पोलिसांनी शिंदेंच्या दोन उमेदवारांना ताब्यात घेतलं.
Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात
Dombivali PoliticsSaam Tv
Published On

Summary:

  • डोंबिवलीमध्ये राजकारण तापले

  • शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांच्यातील राडा प्रकरणात मोठी कारवाई

  • शिंदेसेनेच्या २ उमेदवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • दोन्ही उमेदवारांना जखमी अवस्थेत रुग्णालयातून पोलिसांनी घेतलं ताब्यात

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवली भाजप- शिंदेसेना हाणामारी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रवी पाटील आणि नितीन पाटील या शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना हॉस्पिटलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होतो. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डोंबिवलीमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

डोंबिवली प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी ३ पुरुष आणि १ महिला भाजप कार्यकर्त्यांना पकडले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार विशू पेडणेकर आणि उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत शिवसेना उमेदवारांनी जाब विचारला. यातूनच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात
Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

या हाणामारीत तब्बल चार जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी परस्पर गुन्हा दाखल केला असून सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील, नितीन पाटील यांच्यासह ५ जणांविरोधात प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, हाणामारीत जखमी झालेले भाजप उमेदवारांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात
Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील यांना उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण- डोंबिवलीमधील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी नगरसेवकांनी गर्दी करत पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या कारवाईदरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत आजारी असताना, रक्तदाब वाढलेला असताना अशी कारवाई निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. रुग्णाच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल, असंही मत राजेश मोरे यांनी व्यक्त केले.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात
Maharashtra Politics : राजकारणात चाललंय काय? काँग्रेसचा नेता झाला शिंदेसेनेचा स्वीकृत नगरसेवक

तर या दरम्यान, नितीन पाटील यांच्या पत्नी आणि त्यांचे नातेवाईक आणि महिलांनी रुग्णालयाच्या बाहेर संताप व्यक्त करत, कोणतीही माहिती न देता त्यांना रुग्णालयातून हलवण्यात आल्याचा आरोप केला. माझ्या पतीला काही झालं तर प्रशासन जबाबदार असेल. ही दडपशाही नेमकी कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर डोंबिवलीत शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. एकीकडे प्रभाग २९ मध्ये भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पैसे वाटप आणि मारहाणीच्या आरोपांनंतर आता दोन्ही पक्ष थेट आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. सध्या डोंबिवलीत तणाव कायम असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात
Pune Politics: पुण्यात राजकारण तापलं! भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com