Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

BJP 15 Party Officials Suspended: भाजपने मतदानापूर्वी मोठी कारवाई केली. अमरावतीमध्ये १५ पदाधिकारी आणि सदस्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Devendra Fadnavis Saam tv
Published On

Summary -

  • अमरावती महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप ॲक्शन मोडवर

  • पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी १५ पदाधिकाऱ्यांचे निलंबन

  • अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरीचा ठपका

  • अमरावतीमध्ये आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता

राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावतीमध्ये भाजप ॲक्शन मोडवर आले आहे. मतदानाच्या ३ दिवस आधी भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजपने १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. येत्या काही दिवसात आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती भाजपचे अमरावतीमधील शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपने मोठी कारवाई केली. अमरावती शहरातील भाजप पक्षातील १५ पदाधिकारी आणि सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कार्यवाही केली असून पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
BJP-Shivsena Crisis: गल्लीत नुसता गोंधळ! भाजप-शिवसेनेत जमेना, कुठे कडाडून विरोध तर, कुठे नाराजीनाट्य

निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, त्यांनी पक्ष निर्णयांना विरोध आणि अपप्रचार केल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट होताच सर्वांना प्राथमिक सदस्यत्व आणि पदांवरून तात्काळ निलंबन करण्यात आले. आणखी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले.

मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
BJP- Congress Alliance: मोठी बातमी! भाजप आणि काँग्रेसची युती; अंबरनाथमधील नवं राजकीय समीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com