

अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-काँग्रेसची अनपेक्षित युती
शिंदे सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राजकीय डाव
भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र
अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
मुंबईजवळील अंबरनाथ शहरातील नगर परिषदेमध्ये अजब राजकीय समीकरण जुळून आलंय. अंबरनाथ नगरपालिकेच शिंदे सेनेला चीतपट करण्यासाठी भाजपनं वेगळीच खेळी करत थेट काँग्रेसशी युती केली आहे. भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचं गणित जुळवण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
अंबरनाथ नगरपालिकेत निवडणुकीत शिवसेना शिंदे सेनेच्या सर्वात जास्त २७ नगरसेवक निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिवेसनेला सत्तेपासून ठेवण्यासाठी भाजप, कॉग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती केलीय. या तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या युतीबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सदस्य संख्या ५९ आहे तर सत्तेची मॅजिक फिगर ३० आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत.त्या पाठोपाठ कॉग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे पक्षाचे ४ नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. काँग्रेस ,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांचे मिळून सत्तेचा मॅजिक ३० आकडा गाठणे सहज शक्य आहे. तर एक अपक्ष नगरसेवक हा भाजपमध्ये सामील झाल्याने हा आकडा ३१ वर जातोय. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आल्याच्या भावना तिन्ही पक्षांनी व्यक्त केल्या आहेत.
मागील महिन्यात झालेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील या शिंदेसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा पराभव करून नगराध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या. मात्र नगर परिषदेमध्ये भाजपाला बहुमत मिळालं नव्हतं. येथे शिंदेसेना मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदासह इतर निवडींसाठी एकमेकांविरोधात लढलेले भाजपा आणि शिंदेसेना पुन्हा युती करून एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र भाजपाने सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिंदेसेनेला अंबरनाथच्या सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी वेगळीच खेळी खेळलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.