Nashik Politics: नाशिकमध्ये शिंदेंनी डाव टाकला, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; शरद पवारांना मोठा धक्का

Nashik Politics: महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठे राजकीय वातावरण तापलंय.
Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट
Sharad PawarSaam Tv
Published On
Summary
  • शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

  • नाशिक जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले

  • आगामी महापालिका निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता

राज्यातील २९ महानगर पालिका निवडणूक प्रचारांचा धुरळा उडालाय. पक्षांच्या प्रचार आणि रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. तोच फंडा आता महानगरपालिकेच्या दरम्यान पाहायला मिळतोय. अनेक पक्षांमध्ये इनकमिंगही पहायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

एका बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यानं ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकचे राजकारण ढवळून निघाले.

Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट
एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

या पक्षप्रवेशाचा परिणान आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले, पृथ्वीश भोसले यांचा समावेश आहे.

Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट
राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्यांनी धरली शिंदेसेनेची वाट

दरम्यान नितीन भोसले यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com