Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry
Bigg Boss Marathi 6saam tv

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry : बिग बॉसच्या घरात थेट तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. ज्यामुळे घरात आणखी राडा पाहायला मिळणार आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक कोण, जाणून घेऊयात.
Published on
Summary

बिग बॉसच्या घरात तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली.

घरात एक अभिनेता आणि दोन सुंदर अभिनेत्री आल्या आहेत.

पहिल्याच दिवशी एका वाइल्ड कार्ड स्पर्धकासोबत रुचिताचे भांडण होते.

'बिग बॉस मराठी 6' चा (Bigg Boss Marathi 6) आठवा आठवडा सुरू झाला आहे. सातव्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर शनिवारी रोशन भजनकर यांनी घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर रविवारी भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांना मोठा शॉक बसतो. घरात वाइल्ड कार्ड (Wild Card Entry) स्पर्धकांची एन्ट्री होते. जे घरात आता तुफान राडा घालताना दिसणार आहे. मनोरंजन विश्वातील ओळखीचे चेहरे आता बिग बॉसच्या घरात आले आहे. त्यामुळे यंदा मनोरंजनाचा Triple धमाका पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात तीन वाइल्ड कार्ड एन्ट्री

रविवारी भाऊच्या धक्क्यावर 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात थेट तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. हे स्पर्धक टिव्ही विश्वातील खूपच प्रसिद्ध आहेत. वाइल्ड कार्ड स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे-

रेवा कौरासे ही प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे. संस्कृती साळुंके लोकप्रिय रिॲलिटी शो स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डान्सर आणि मॉडेल आहे. तर संकेत पाठक हा प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्याने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेवा, संस्कृती आणि संकेत शॉर्टकटच्या दरवाजाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतात. तिघांना देखील पॉवर की मिळते.

बिग बॉसच्या घरात एकत्र तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांना पाहून घरातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. आता बिग बॉसच्या घरात नवीन राडा पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात येताच रेवा कौरासे आणि रुचिता यांच्यात शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. दोघीही पहिल्याच दिवशी भांडायला लागतात. बिग बॉसचे येणार भाग खूपच रंजक असणार आहे.'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

एलिमिनेट झालेल्या सदस्यांची यादी

  • राधा पाटील

  • सोनाली राऊत

  • दिव्या शिंदे

  • ओंकार राऊत

  • करण सोनावणे

  • आयुष संजीव

  • सचिन कुमावत

  • रोशन भजनकर

Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry
Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com