Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

Famous Actress : इस्रायल इराण युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री UAE मध्ये अडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून तेथील परिस्थिती सांगितली आहे.
Famous Actress
Israel Iran Warsaam tv
Published On
Summary

इस्रायल इराण युद्ध अधिकच तीव्र होत जात आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री UAE मध्ये अडकली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिने मदत मागितली आहे.

जगभरात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर (Israel Iran War) केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. इराणने मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे टाकून प्रत्युत्तर दिले आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता देखील युएईमध्ये अडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तेथील परिस्थितीची माहिती शेअर केली आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलं की, "माझ्या तब्येतीबद्दल विचारणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्या प्रत्येकाची मी माफी मागू इच्छिते, कारण मी उत्तर देऊ शकले नाही. आम्ही ठीक आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. परिस्थिती भयावह आणि खूप कठीण आहे. देव आमचे रक्षण करत आहे.आम्हाला विश्वास आहे की युएईचे संरक्षण मंत्रालय सुरक्षा आणि बचाव कार्यात सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. मला लवकरच घरी परतण्याची आशा आहे."

ईशा गुप्ता वर्कफ्रंट

ईशा गुप्ता ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिच्या कारकिर्दीत ईशाने 'हमशकल्स', 'बेबी', 'पलटन' आणि 'टोटल धमाल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अक्षय कुमारसोबत 'रुस्तम' चित्रपटात काम केले होते. ईशा बॉबी देओलच्या लोकप्रिय वेब सीरिज 'आश्रम' मध्ये देखील दिसली होती.

Esha Gupta
Esha Guptasaam tv

सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली

इस्रायल इराण युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.ती एक उत्तम गायिका देखील आहे. इस्रायल इराण युद्धादरम्यान दुबईमध्येही हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे दुबई विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Famous Actress
New Marathi Serial : स्वाभिमान vs अहंकार; शूटिंग सेटवर सुरू होणारी लव्हस्टोरी घेऊन येतेय 'मोहिनी', 'या' लोकप्रिय अभिनेत्याचे कमबॅक|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com