Manasvi Choudhary
आज १५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचं मतदान पार पडत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.
मराठीसह अनेक बॉलिबूड सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क बजावला आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी मतदान केल्याचा फोटो शेअर करत सर्वांना मतदान करावे असं सांगितलं आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मतदानाचा हक्क बजावला आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताने फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेने मतदान केले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी जुहू येथील केंद्रावर मतदान केले
अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी जुहू येथील गांधी शिक्षण भवन केंद्रावर सकाळी सर्वात आधी मतदान केले.