Manasvi Choudhary
मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदानाच्या वेळी बोटाला शाई लावली जाते. मात्र तुम्हाला माहितीये का? मतदानाच्या वेळी बोटाला शाई का लावतात.
एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त वेळा किंवा वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू नये, यासाठी ही शाई लावली जाते.
एकदा बोटावर शाई लागली की, ती व्यक्ती 'मतदान करून आली आहे' याची ती स्पष्ट खूण असते. यामुळे व्यक्ती दोनदा मतदान करू शकत नाही.
या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट असते. जेव्हा ही शाई आपल्या त्वचेवर लावली जाते आणि प्रकाशाच्या संपर्कात येते, तेव्हा ती त्वचेवर कायमस्वरूपी काळा-निळा डाग उमटतो हा डाग पाणी, साबण, तेल किंवा कोणत्याही केमिकलने सहजी पुसला जात नाही.
बोटाला लावलेली ही निळी शाई म्हणजे तुम्ही एका जबाबदार नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य बजावल्याचा पुरावा आहे.
पूर्वी ही शाई फक्त त्वचेवर लावली जायची, पण लोक ती घासून पुसण्याचा प्रयत्न करायचे. १९७१ पासून निवडणूक आयोगाने नियम बदलला आणि शाई नखाच्या मुळापासून त्वचेपर्यंत लावायला सुरुवात केली. नख जसे वाढते, तशीच ही शाई हळूहळू निघते, तोपर्यंत ती किमान २ ते ४ आठवडे टिकते.