Priya More
बॉलीवूडची बोल्ड ब्युटी ईशा गुप्ता आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
ईशा गुप्ताने 'जन्नत 2', 'राझ 3D', 'चक्रव्यूह' आणि 'रुस्तम' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'आश्रम' सारख्या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे. या वेबसीरिजमधील बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
ईशा गुप्ताने २०१२ मध्ये अॅक्शन थ्रिलर 'जन्नत 2' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२००७ मध्ये ईशा गुप्ताला मिस इंडिया इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ती प्रकाशझोतामध्ये आली.
अभिनयासोबतच ईशा गुप्ताचा फॅशन सेन्स आणि तिचे सौंदर्य चाहत्यांना प्रचंड आवडते.
ईशा गुप्ताचे जीवन आणि यश हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याने चाहते तिच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल नेहमीच उत्सुक असतात.