Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 6' चा आठवा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात रोशन भजनकर याचा घरातील प्रवास संपला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेताना आणि कौतुक करताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घरात राखी सावंतने पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. तिने तीन आठवडे बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. तिचा ड्रामा पाहून प्रेक्षक खळखळून हसतात.
'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, हिंदी टिव्ही अभिनेत्री रेवा कौरसे हिचे 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
सोशल मीडियावर देखील तिचे कलाकार मित्रमंडळी तिला नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. रेवा कौरसे कायम आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली आहे.
'दीवानियत' या मालिकेमुळे रेवा कौरसेला खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'प्यार का पहला अध्याय:शिव शक्ति' या शोजमध्ये देखील ती दिसली होती.
'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव, सचिन कुमावत आणि रोशन भजनकर हे सदस्य बाहेर गेले आहेत.
येणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर राकेश आणि राखीचे लग्न लागताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा होणार आहे. 'बिग बॉस मराठी 6' ची ट्रॉफी कोण उचलणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.