Shreya Maskar
'सबसे कातिल गौतमी पाटील' कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती एक प्रसिद्ध नृत्यांगना आहे. तिच्या डान्सचे लाखो चाहते दिवाने आहेत.
गौतमी पाटीलने सुंदर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट केले आहे. तिने केशरी रंगाचा सूट परिधान केला आहे. ज्यावर पांढऱ्या रंगाचा नक्षीकाम पाहायला मिळत आहे.
कपाळावर बिंदी, हातात बांगडी, मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.
सादगीमध्ये गौतमी पाटीलचे सौंदर्य खुलून आले आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे लावणी पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
गौतमी पाटीलच्या या सिंपल पण सुंदर फोटोंवर चाहते कमेंट्स करून हार्ट इमोजीचा वर्षाव करत आहे. तसेच कमेंट्समध्ये "सुंदर", "छान", "गोड दिसतेस" अशा कमेंट्स येत आहेत.
अलिकडेच गौतमी पाटीलचे एक सुंदर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. ज्याचे नाव 'रुपेरी वाळूत' असे आहे. या गाण्यात गौतमी पाटील गायक अभिजीत सावंतसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे.
अलिकडेच गौतमी पाटीलने 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. गौतमीला fa9la गाण्याची भुरळ पडली आहे. अक्षय खन्नाची गाण्यातील व्हायरल स्टेप करताना ती दिसली.
गौतमी पाटील नृत्यासोबत आता अभिनय क्षेत्रात देखील काम करते. ती अनेक मराठी शो आणि मालिकांमध्ये दिसते. तिची अनेक गाणी कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात.