Shreya Maskar
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नुकताच 'आशा' हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट 19 डिसेंबरपासून चित्रपटगृहात आला. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे.
नुकतेच रिंकूने सुंदर साडीत फोटोशूट केले आहे. जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत. साडीत रिंकूचे सौंदर्य खुलले आहे. रिंकूला आर्ची म्हणून ओळखले जाते.
रिंकूने गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर सोनेरी कानातले, गळ्यात छान हार, हातात स्टायलिश बांगडी आणि सुंदर घड्याळ परिधान केले आहे.
केसांचा बन, कपाळावर बिंदी, पायात पैंजण आणि मिनिमल मेकअपने तिने हा भन्नाट लूक पूर्ण केला आहे. रिंकूच्या साडीतील सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.
रिंकू राजगुरूने हिरव्यागार गवतात बसून फोटोशूट केले आहे. या फोटोंना तिने हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "कुछ यूँ मिली नज़र उनसे कि, बाक़ी सब नज़रअंदाज़ हो गये..."
रिंकूच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. फोटोंवर "मराठी चित्रपट दुनियेतील दीपिका पदुकोण", "आर्ची खूप सुंदर", "गोंडस" अशा कमेंट्स येत आहेत.
रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
रिंकू राजगुरूने 2016 साली रिलीज झालेल्या 'सैराट' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिचे आर्ची पात्र जगभर गाजले.