Shreya Maskar
'रामायण' चित्रपटात मुख्य भूमिकेत रणबीर कपूर झळकणार आहे.'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंग'मुळे चांगला चर्चेत आहे. 'किंग' मध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खान देखील झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग' चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बॉर्डर 2' नवीन वर्षी 23 जानेवारी 2026ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. सनी देओल 'बॉर्डर 2'मध्ये मुख्य भूमिकेत आहे.
'मर्दानी 3' मध्ये राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
'धुरंधर' चित्रपटाचा दुसरा सीक्वल 206 मध्ये येणार असल्याचे बोले जात आहे. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
अल्फा हा आलिया भट्ट आणि शर्वरी वाघचा ॲक्शन, स्पाय, थ्रिलर सिनेमा आहे. 'अल्फा' 17 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे. 'अल्फा' हा भारतातील पहिला महिला-प्रधान ॲक्शन चित्रपट आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मधून विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 ला रिलीज होणार आहे.
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट 2 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे.