Shreya Maskar
ख्रिसमस 2025 ला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट रिलीज झाला आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. हा चित्रपट समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केला आहे.
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटात कोणाला किती मानधन मिळाले जाणून घेऊयात.
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने तब्बल 50 कोटी मानधन घेतले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.
अनन्या पांडेला कार्तिक आर्यनपेक्षा 10 पट मानधन कमी देण्यात आले आहे. निर्मात्यांनी चित्रपटासाठी अनन्याला सुमारे 5 कोटी रुपये फी दिले आहे.
जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटात रुमीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ज्यासाठी त्यांना 1.7 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. त्यांचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला.
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता देखील 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटात झळकल्या आहेत. त्यांना 1 कोटी रुपये मिळाले आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाने तीन दिवसांत 18.25 कोटी रूपयांची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल असे बोले जात आहे.