Shreya Maskar
'कोण होतीस तू, काय झालीस तू!' मालिकेतील खलनायिकेने खऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर तिने एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
मराठमोळी अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. रेवतीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडतो.
अभिनेत्री रेवतीने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तिच्या हातातील बोटात अंगठी पाहायला मिळत आहे. तसेच गुलाब आणि सूर्यफुलांचा सुंदर गुच्छ दिसत आहे.
तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या शेवटच्या फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक पाहायला मिळत आहे. मात्र हा नेमका कोण ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
आता सोशल मीडियावर रेवतीच्या होणाऱ्या नवऱ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. चाहते रेवती नवऱ्याचा फेस रिव्हिल केव्हा करणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रेवतीने या हटके फोटोंना रोमँटिक कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "My heart said yes before I did..." फोटोंमध्ये रेवती खूपच खुश आणि आनंदी पाहायला मिळत आहे.
रेवतीने केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी कमेंट्स करताना तसेच शुभेच्छा देताना दिसत आहेत. रेवती याआधी अभिनेता आदिश वैद्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु दोघांचा काही कारणास्थव ब्रेकअप झाला.
रेवतीने 'लग्नाची बेडी' , 'स्वामिनी' या मालिकांमध्ये काम केले आहे. 'लग्नाची बेडी' मालिकेतून रेवतीला खूप लोकप्रियता मिळाली.