Shreya Maskar
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा रोमँटिक ड्रामा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' 25 डिसेंबर ख्रिसमसला रिलीज झाला आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.75 कोटी रुपये कमावले तर जगभरात 17.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला असून तो समीर विद्वांस दिग्दर्शित आहे.
चित्रपटात कार्तिक आर्यन , अनन्या पांडेसोबत नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, अरुणा इराणी आणि टिकू तलसानिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटात थिएटर रिलीजनंतर ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
मात्र अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख अधिकृतरित्या जाहीर झाली नाही. मात्र असे बोले जाते की, चित्रपट फेब्रुवारी 2026 महिन्यात ओटीटीवर पाहायला मिळेल.
2019 साली रिलीज झालेल्या 'पती पत्नी और वो' मध्ये देखील अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनने एकत्र काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटात अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.