Shreya Maskar
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज (27 डिसेंबर) 60 वर्षांचा झाला आहे. भाईजानच्या वाढदिवसाचे रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी सेलीब्रेशन झाले.
सलमान खानने 1988 मध्ये रिलीज झालेल्या 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्याला 1989 साली रिलीज झालेल्या 'मैंने प्यार किया' मुळे खूप लोकप्रियता मिळाली.
सलमान खानकडे भारत आणि परदेशात भरपूर मालमत्ता आहे. तो मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्समध्ये राहतो. ज्याची किंमत जवळपास 100-150 कोटी आहे. तसेच त्याचे पनवेलमध्ये 'अर्पिता फार्म्स' आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
सलमान खानकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. ज्यात टोयोटा लँड क्रूझर, निसान पेट्रोल, एसयूव्ही, रेंज रोवर एसवी एलडब्ल्यूबी, ऑडी, मर्सिडीज, पोर्श केयेन टर्बो यांचा समावेश आहे. या कारची किंमत जवळपास कोटींच्या घरात आहे.
सलमान खानने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच सलमान खान अनेक मोठ्या ब्रँड्सचा मालक देखील आहे. ज्यात कपड्याचा ब्रँड 'बीइंग ह्युमन' , 'बीइंग स्ट्रॉंग' हा फिटनेस इक्विपमेंट यांचा समावेश आहे.
सलमान खान चित्रपट, बिग बॉस हिंदी होस्टिंग, जाहिराती, रिअल इस्टेट, गेम, प्रोडक्शन, व्यवसाय यांमधून बक्कळ पैसा कमावतो. सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भाईजान सलमान खान फिल्म्स नावाची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी देखील चालवतो. ज्याद्वारे त्याने 'बजरंगी भाईजान', 'ट्युबलाइट', 'रेस ३', 'भारत' आणि इतर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
भाईजानचे मुंबईतील गोराई येथे आकर्षक बीच हाऊस आहे. तसेच दुबईतील बुर्ज पॅसिफिक टॉवर्समध्ये अपार्टमेंट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती जवळपास 2,900 कोटी रुपयांच्यावर आहे.