Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल कायम तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.
अमीषा पटेलने 2000 साली रिलीज झालेल्या 'कहो ना…प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन झळकला होता. या चित्रपटामुळे अमीषाला खूप लोकप्रियता मिळाली.
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. अभिनेत्री आता 50 वर्षांनी असूनही अविवाहित आहे. तिला अनेकदा लग्नाबद्दल विचारले जाते आणि ती योग्य उत्तर देऊन प्रेक्षकांची मने जिंकते.
अलिकडे एका कार्यक्रमात अमिषाला विचारण्यात आले, "सलमान खान अविवाहित आहे, तूही अविवाहित आहेस. तुम्ही दोघे एकत्र का येत नाही?"
अमिषा उत्तर देत म्हणते की, "हा प्रश्न प्रेक्षकांपासून ते माध्यमांपर्यंत सर्वजण नेहमीच विचारतात. तुम्ही सर्वजण मॅचमेकर म्हणून काम करता, कायम मला वेगवेगळी मते मिळतात..."
अमिषा पुढ म्हणाली, "बरेच लोक म्हणतात की, तुम्ही सलमानसोबत चांगले दिसता. तुम्ही त्याच्यासोबत असले पाहिजे. तुम्ही लग्न करा. जेणेकरून आपल्याला सुंदर भारतीय मुले भेटतील..."
अमिषा सलमान खान विषयी बोलते की, "पण सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. तसेच मी सिंगल (अविवाहित) राहून खूप आनंदी आहे..."
अमीषा पटेल 2023 मध्ये 'गदर 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर 2024ला ती 'तौबा तेरा जलवा' मध्ये पाहायला मिळाली. चाहते आता अमीषा पटेलच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.