Shreya Maskar
'सैयारा' फेम अभिनेता अहान पांडेचा वाढदिवस आज (23 डिसेंबर) ला आहे. आज अहान 28 वर्षांचा झाला आहे.
2025 अहानसाठी खूप खास ठरले. यावर्षी अहानचा 'सैयारा' चित्रपट आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'सैयारा' मधून अहान पांडेला खूप लोकप्रियता मिळाली.
अहान पांडेने मुंबईच्या ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने सिनेमॅटिक आर्ट्समध्ये पदवी मिळवली. पटकथा लेखन, संपादन, दिग्दर्शन आणि पोस्ट-प्रॉडक्शन हे त्याच्या अभ्यासाचा भाग होते.
'सैयारा' मधून अहान पांडेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याआधी त्यांने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. उदा. फ्रीकी अली, मर्दानी 2
अहान पांडेकडे मर्सिडीजसारख्या आलिशान गाड्याही आहेत. अभिनेता मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान घरात राहतो.
अहान पांडे चित्रपट, मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करतो. तसेच तो सोशल मीडिया पोस्ट्समधूनही भरपूर पैसे कमावतो.
'सैयारा' मधून अहान पांडे आणि अनीत पड्डा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अहानने 'सैयारा'साठी 3-5 कोटी मानधन घेतले.
मीडिया रिपोर्टनुसार, अहान पांडे दरमहा 30-35 लाख रुपये कमावतो. अहान पांडेची एकूण संपत्ती जवळपास 41 कोटी आहे. पण हा आकडा निश्चित नाही.