ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली.
सूरज चव्हाणने बायकोसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघेही मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.
व्हिडीओत दोघे एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहे. त्यानंतर संजना सूरजच्या मांडीवर बसते. सूरज रोमँटिक अंदाजात संजानाच्या हातावर किस करतो. सूरज संजनाची नजर काढतो.
व्हिडीओत दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहे. सूरज संजनाच्या पायात पैंजण घालतो. तेव्हा संजना त्याची नजर काढते आणि फ्लाईंग किस देते.
सूरज चव्हाणने ऑफ व्हाइट रंगाचा गोल्डन प्रिंट असलेला कुर्ता परिधान केला आणि धोतर नेसले आहे. कापाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत.
संजनाने केशरी, लाल रंगाची पैठणी साडी नेसली आहे. त्यावर हिरवा शालू घेतला आहे. कापाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. संजना नवरी सारखी नटली आहे.
संजनाने मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. कपाळावर चंद्रकोर, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. ब्रायडल मेकअप करून सूरजची नवरी सजली आहे.
सूरज-संजनाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. त्यांच्या जोडीचे कौतुक होताना दिसत आहे. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली.