Shreya Maskar
'इंडियन आयडल 12' फेम गायिका सायली कांबळेने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे.
गायिका सायली कांबळे नुकतीच आई झाली आहे. सायलीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सायलीने 2022ला प्रियकर धवलबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार एक खास पोस्ट करून सायली आणि धवलने पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
सायली कांबळेला 12 डिसेंबर 2025 रोजी मुलगा झाला. बाळाच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली आहे.
पोस्टला त्यांनी खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचे प्रेम...आम्हाला मुलगा झाला... तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद!"
सध्या सायलीवर चाहते, कलाकार, मित्र मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अलिकडेच सायलीचे थाटामाटात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने डोहाळे जेवण पार पडले. तिने आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.